पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांग पाटील हे जनजागृती आणि शांतता रॅली काढण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला असून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही रान उठवत आपापल्या भूमिका मांडत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला आणि सभांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज पुण्यातील सारसबाग येथून डेक्कनपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला सुरवात झाली. तसेच मनोज जरांगे पाटील यांची डेक्कन भागात सभा होणार आहे. जरांगे यांच्या या रॅलीला पुणे शहर आणि जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या या रॅलीमुळे शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा विचार करता सारसबाग, बाजीराव रोड, शनिवारवाडा, जंगली महाराज रोड या मार्गावरील वाहतूक अंतर्गत रस्ताने वळवण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या रॅलीच्या मार्गावरील प्रत्येक चौकामध्ये जरांगे पाटलांचे स्वागत केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मोठी बातमी: मालेगावात अजित पवारांच्या जीवाला धोका; गुप्तचर विभागाची माहिती
-Big Boss Marathi: सुरज चव्हाणच्या ‘झापूक झुपूक’वर अक्षय कुमारही थिरकला
-‘माझा फोन हॅक झालाय’; सुप्रिया सुळेंच्या मोबाईल हॅकने राजकीय वर्तुळात खळबळ
-अजित पवारांच्या ‘त्या’ चुकीमुळे नाराज आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात?
-ऐन विधानसभेच्या तोंडावर मनसेला पुण्यात मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश