Big Boss Marathi : बिग बॉस मराठी सिझन ५ सुरु होऊन २ आठवडे झाले आहेत. बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांनी यंदा चांगलीच कल्ला केला आहे. बिग बॉसचा दुसऱ्या आठवड्यात भाऊचा धक्का झाला. त्यामध्ये सर्वांनाच भाऊचा ओरडा मिळाला. काहींवर कौतुकाचा वर्षाव झाला. तर काहींना योग्य मार्ग दाखवण्यात आला. बिग बॉस मराठीचे होस्ट रितेश देशमुखने यावेळी जान्हवी किल्लेकर, घनश्याम दरोवडे, अरबाज, निक्की तांबोळीची चांगलीच शाळा घेतली आहे.
मात्र, बिग बॉसच्या घरात आता बॉलिवूड अभिनेता खिलाडी अक्षय कुमारची एन्ट्री होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावर ‘खेल खेल में’ या चित्रपटाची टीम कल्ला करणार आहे. त्यांच्या कल्ल्याने रविवारचा ‘भाऊचा धक्का’ एकदम झापुक झुपुक होणार आहे. अक्षय कुमार सुरज चव्हाणच्या झापूक झुपुकवर थिरकल्याचे पहायला मिळाला. सुरज चव्हाणला महाराष्ट्रातून भरभरून प्रेम मिळत आहे.
भाऊच्या धक्क्यावर अक्षय कुमार घरातील सर्वांशी बोलला. त्यानंतर सूरजच्या स्टाईलने भाऊच्या धक्क्यावर रितेश आणि अक्षय कुमार ‘झापुक झुपुक’वर थिरकताना दिसला आहे. अगदी छोट्याशा गावाहून आलेल्या सुरज चव्हाणने चक्क अक्षय कुमारला देखील आपल्या स्टाईलवर थिरकवल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘माझा फोन हॅक झालाय’; सुप्रिया सुळेंच्या मोबाईल हॅकने राजकीय वर्तुळात खळबळ
-अजित पवारांच्या ‘त्या’ चुकीमुळे नाराज आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात?
-ऐन विधानसभेच्या तोंडावर मनसेला पुण्यात मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश
-Big Boss Marathi: निक्कीनंतर रितेश भाऊ घेणार ‘या’ स्पर्धकाची शाळा
-पुण्यात दहशतवादी बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात; पोलीस आयुक्तांचं नामांकित हॉटेलला पत्र