पुणे : राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून जोमाने तयारी सुरु आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे काही आमदार हे पक्षावर नाराज असून शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. कामांना मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी पक्षबदल केल्यास संबंधित आमदारांना राजकीय फायदा होऊ नये, यामुळे खबरदारी म्हणून घेण्यात आली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आपल्याच आमदारांचा जिल्हा नियोजन समितीचा निधी रोखून धरल्याने हे आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे.
अजित पवारांनी निधी रोखून धरल्याने राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून नाराज आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात डीपीसी अंतर्गत जिल्ह्याला सर्वाधिक निधी अजित पवारांनी आणला आहे.
‘डीपीसी’च्या माध्यमातून आमदार आपापल्या मतदारसंघात विकासाची कामे सुचवत असतात. जिल्ह्यातील आमदारांनी विविध कामांचे प्रस्ताव दिले. त्यांपैकी १ हजार २५६ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी गेल्या महिन्यात खासदार अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपूर्वी हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि शरद पवार हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर दिसले होते. यावरुनही अनेक राजकीय चर्चेला उधाण आले.
महत्वाच्या बातम्या-
-ऐन विधानसभेच्या तोंडावर मनसेला पुण्यात मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश
-Big Boss Marathi: निक्कीनंतर रितेश भाऊ घेणार ‘या’ स्पर्धकाची शाळा
-पुण्यात दहशतवादी बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात; पोलीस आयुक्तांचं नामांकित हॉटेलला पत्र
-अरविंद शिंदेंचा मास्टर प्लॅन; ठाकरेंचा शिवसैनिक गळाला लावत बागवेंवर मोठी कुरघोडी
-‘शिवस्वराज्य यात्रे’च्या मंचावर अजित पवारांच्या माजी आमदाराच्या पत्नीची उपस्थिती; नेमका काय प्रकार?