पुणे : लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी पुण्यातील फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आाता मनसेला पुण्यातून आणखी धक्का बसला आहे. वाघोलीतील उपविभाग प्रमुख प्रकाश जमधडे यांनी मनसेला ‘रामराम’ ठोकत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ‘तुतारी’ घेतली आहे.
प्रकाश जमधडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. त्यानंतर त्यांची हवेली तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रकाश जमदाडे यांच्यासह हवेली तालुका उपाध्यक्ष अतिश ढगे, अक्षय चोपडे, ज्ञानेश्वर गायकवाड, किरण मिंडे, आपचे अजिंक्य शेंडगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख, जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, हवेली तालुका अध्यक्ष संदीप गोते यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. ऐन विधानसभेच्या तोंडावर जामधडे पक्षप्रवेशामुळे मनसेला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाची या भागात तादक वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Big Boss Marathi: निक्कीनंतर रितेश भाऊ घेणार ‘या’ स्पर्धकाची शाळा
-पुण्यात दहशतवादी बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात; पोलीस आयुक्तांचं नामांकित हॉटेलला पत्र
-अरविंद शिंदेंचा मास्टर प्लॅन; ठाकरेंचा शिवसैनिक गळाला लावत बागवेंवर मोठी कुरघोडी
-‘शिवस्वराज्य यात्रे’च्या मंचावर अजित पवारांच्या माजी आमदाराच्या पत्नीची उपस्थिती; नेमका काय प्रकार?
-बच्चू कडू महाविकास आघाडीसोबत आले तर? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘महाराष्ट्रासाठी चांगल्या लोकांनी…’