Big Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन सुरु आहे. या सिझनला सुरवात होऊन २ आठवडे झाले. यामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये कल्ला करुन निक्की तांबोळीने संपूर्ण आठवडा गाजवला आणि पहिल्याच भाऊच्या धक्क्यावर निक्कीने होस्ट रितेश देशमुखचा ओरडाही खाल्ला. त्यानंतर दुसरा आठवडा गाजवला तो जान्हवी किल्लेकरने.
जान्हवी किल्लेकरची घरातील अनेक सदस्यांशी भांडणं झाली. बिग बॉस हा खेळच असा आहे की यामध्ये प्रत्येकाच्या शक्ती, युक्तीसह संयम देखील तपासला जातो. बिग बॉसच्या घरात असताना अनेकांनी आपली भाषा सोडून वक्तव्ये केलीत. अनेकांनी आपल्या शब्दांवर ताबा ठेवला नाही, तसेच आता जान्हवीने देखील आपल्या जिभेवर ताबा न ठेवल्याने भाऊच्या धक्क्यावर रितेशने तिची शाळा घेतली आहे.
निक्की तांबोळी आठवडाभर उर्षा उसगांवकरच्या मागे लागत जिभेचा ताबा सोडून बोलली होती. त्यानंतर आता जान्हवीने वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, आर्या जाधवशी यांच्याशी कडाक्याची भांडणं केली. याच भांडणात जान्हवी अभिजीतला ‘बांगड्या घाल’ असं म्हणाली होती. तिच्या त्याच वक्तव्यावरून ‘भाऊचा धक्का’ मध्ये रितेश देशमुखने तिची चांगलीच कानउघडणी केली आहे.
रितेशने बांडग्या घालणाऱ्या स्त्रीचं महत्व जान्हवीला खडसावून सांगितलं आहे. बांगड्या म्हणजे शक्तीचं प्रतिक असलं पाहिजे, याच बांगड्या घालणाऱ्या स्त्रिया फक्त घर नाही तर संपूर्ण देश सांभाळतात. मी बाकीच्यांना बाहेर काढेन की नाही हे माहिती नाही पण तुम्हाला नक्कीच काढेन, असे रितेश म्हणाला आहे. बिग बॉसच्या या दुसऱ्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्याचा प्रमो तुफान व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात दहशतवादी बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात; पोलीस आयुक्तांचं नामांकित हॉटेलला पत्र
-अरविंद शिंदेंचा मास्टर प्लॅन; ठाकरेंचा शिवसैनिक गळाला लावत बागवेंवर मोठी कुरघोडी
-‘शिवस्वराज्य यात्रे’च्या मंचावर अजित पवारांच्या माजी आमदाराच्या पत्नीची उपस्थिती; नेमका काय प्रकार?
-बच्चू कडू महाविकास आघाडीसोबत आले तर? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘महाराष्ट्रासाठी चांगल्या लोकांनी…’
-राज्य मंडळाच्या शुल्क परताव्यात तांत्रिक अडचणी; विद्यार्थ्यांना शुल्क परतावा कधी मिळणार?