पुणे : पुणे काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून शहराध्यक्ष बदलावरुन मोठा वाद सुरु होता. हा वाद पुण्यापासून ते दिल्लीपर्यंत पोहचला. यावरुन गटातटाचे राजकारण सुरु आहे. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अविनाश साळवे यांनी शिवबंधन तोडले अन् काँग्रेस हात धरला आहे. या पक्षप्रवेशामुळे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या विरोधात दिल्ली गाठणाऱ्या शिष्टमंडळाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
अविनाश साळवे यांच्या पक्षांतरीची प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. या प्रक्ष प्रवेशाबाबत काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना देखील साधी कुणकुणही लागली नसल्याचे आता समोर आले आहे. अरविंद शिंदे यांना शहराध्य पदावरुन हटवण्याची मागणी करणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार रमेश बागवे करत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत बागवे हे पुन्हा एकदा पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, अरविंद शिंदे यांनी आता साळवे यांना पक्षात घेऊन मोठी खेळी खेळल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण अविनाश साळवे यांच्या पक्षप्रवेशावेळी त्यांना पुणे काँन्टन्मेंट विधानसभेची उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यामुळे आता रमेश बागवे यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. आता पक्षश्रेष्ठींकडून काँग्रेसमध्ये नव्याने दाखल झालेल्या साळवेंना की आधीपासून इच्छुक असणाऱ्या रमेश बागवेंना उमेदवारी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘शिवस्वराज्य यात्रे’च्या मंचावर अजित पवारांच्या माजी आमदाराच्या पत्नीची उपस्थिती; नेमका काय प्रकार?
-बच्चू कडू महाविकास आघाडीसोबत आले तर? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘महाराष्ट्रासाठी चांगल्या लोकांनी…’
-राज्य मंडळाच्या शुल्क परताव्यात तांत्रिक अडचणी; विद्यार्थ्यांना शुल्क परतावा कधी मिळणार?
-शरद पवार भाजपला धक्का देणार?; भाजपचे संजय काकडे पोहचले शरद पवारांच्या भेटीला
-Pune Drugs: विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात पुन्हा ड्रग्ज प्रकरण उघडकीस