पुणे : राज्यात येऊ घातलेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यभर निवडणुकीचे वातावरण आहे. राजकीय नेत्यांच्या गावभेटी-दौरे, सभा, बैठका, जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा सुरु आहे, तर एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रेला कालपासून सुरवात केली आहे. याच शिवस्वराज्य यात्रेची सुरवात शिवनेरी गडावरुन करण्यात आली. आणि याच शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत नवा ट्विस्ट पहायला मिळाला आहे.
‘शिवस्वराज्य यात्रे’च्या बॅनरवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांचा फोटो आणि याच मंचावर विलास लांडे यांच्या पत्नीने हजेरी लावल्याचे पहायला मिळाले आहे. यावरुन आता विलास लांडे नेमक्या कोणत्या राष्ट्रवादीचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांचे निकटवर्तीय अजित गव्हाणे यांनी अजितदादांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत शरद पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी विलास लांडे यांच्या मदतीने शरद पवार गटात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया अजित गव्हाणे यांनी दिली होती.
त्यानंतर आता शरद पवार गटाच्या कार्यक्रमात लांडेंचा फोटो त्यांच्या पत्नीची मंचावर हजेरी यावरुन अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यावर शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘लांडे यांचा संपर्क झाला नाही. शिवस्वराज्य यात्रेच्या मेळाव्यात ते होते की नाही हे मला माहित नाही. मला कुणी भेटलेल नाही, असे जयंत पाटलांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बच्चू कडू महाविकास आघाडीसोबत आले तर? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘महाराष्ट्रासाठी चांगल्या लोकांनी…’
-राज्य मंडळाच्या शुल्क परताव्यात तांत्रिक अडचणी; विद्यार्थ्यांना शुल्क परतावा कधी मिळणार?
-शरद पवार भाजपला धक्का देणार?; भाजपचे संजय काकडे पोहचले शरद पवारांच्या भेटीला
-Pune Drugs: विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात पुन्हा ड्रग्ज प्रकरण उघडकीस
-‘नागपंचमीला गुलाबी रंगाची पुंगी वाजवून…’; अमोल कोल्हेंचा अजितदादांना टोला