पुणे : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच पुण्यातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यातील त्यांच्या मोदीबाग या निवासस्थानी आहेत. यावेळी मोदीबागेत सकाळी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी शरद पवारांची भेट घेतली.
त्यानंतर आता भाजपचे माजी खासदार संजय काकडे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी मोदीबागेत पोहचले आणि शरद पवारांची भेट घेतली आहे. संजय काकडे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे.
संजय काकडे यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ‘मी माझ्या वैयक्तिक कामासाठी त्यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. या भेटीत वैयक्तिक कामाबाबत चर्चा झाली आहे. मला माझ्या पक्षांनी याबाबत प्रश्न विचारल्यास मी त्यांना उत्तर देईल’, असे संजय काकडे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Drugs: विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात पुन्हा ड्रग्ज प्रकरण उघडकीस
-‘नागपंचमीला गुलाबी रंगाची पुंगी वाजवून…’; अमोल कोल्हेंचा अजितदादांना टोला
-‘सरकार घाबरलंय त्यामुळे…’; विधानसभा निवडणूक कधी लागणार? जयंत पाटलांनी सांगितला मुहूर्त
-भोरमध्ये यंदा थोपटेंचा ‘संग्राम’ रोखणार मुळशी पॅटर्न अन् अजितदादा बारामतीचा बदला घेणार?
-राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे दाखवत मिळवली नोकरी; बच्चू कडूंच्या अभियाने फुटणार बिंग