पुणे : राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोमाने तयारी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनी जनसन्मान यात्रा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडून शिवस्वराज्य यात्रेला सुरवात केली आहे. अशातच महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागावाटप अद्याप झाले नाही. मात्र त्यापूर्वीच दोन्हीबाजूच्या नेत्यांकडून अनेक जागांवर दावा केला जात आहे. आता अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.
‘सरकार घाबरलं आहे त्यामुळे दिवाळीनंतरच निवडणूका घेणार आहे. कदाचित १५ नोव्हेंबरनंतर निवडणूक लागेल. तोपर्यंत जनतेची दिशाभूल करणाऱ्या अनुषंगाने आपली तिजोरी खाली करण्यासाठी यांना अधिकचा वेळ हवा आहे’, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
मागील वेळी शिवस्वराज्य यात्रा झाली त्यावेळी सुद्धा पहिली सभा पार पाडून मी सांगलीला गेलो होतो. बरोबर तो आजचा दिवस होता. सांगलीत पाणीच पाणी झालं होतं. त्यावेळी आमची बोट पाण्यामध्ये अडकली होती. तेव्हा मी त्यातून सुखरूप बाहेर पडलो. आज पुन्हा एकदा क्रेन कलल्याची घडना घडली. म्हणजे अमोल कोल्हे साहेब राज्यात आपल्याकडे लक्ष आहे. आता बदल आढळ असल्याचं ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-भोरमध्ये यंदा थोपटेंचा ‘संग्राम’ रोखणार मुळशी पॅटर्न अन् अजितदादा बारामतीचा बदला घेणार?
-राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे दाखवत मिळवली नोकरी; बच्चू कडूंच्या अभियाने फुटणार बिंग
-स्वातंत्र्यदिनापूर्वी दिल्ली पोलिसांकडून मोस्ट वाँटेड दहशतवादी रिझवानला अटक; पुण्याशी होता संबंध