पुणे : गेल्या काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले अनेकांना पराभवाची धूळ पत्कारावी लागली तर अनेकांनी अनपेक्षित विजय मिळवला. अशातच पराभूत झालेल्या अनेकांना परभव काही पचनी पडल्याचे दिसत नाही. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता. या निवडणुकीत शिंदे गटाच्या श्रीरंग बारणे यांनी ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांचा परभव करत विजय मिळवला. मात्र बारणेंचा विजय काहींना पचनी पडला नसल्याचे दिसत आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदारकीवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. त्यानंतर अपक्ष उमेदवार अॅड. राजू पाटील यांनी आता श्रीरंग बारणे यांच्या विजयावर आक्षेप घेत मंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा वाद आता थेट न्यायालयात पोहचला आहे. श्रीरंग बारणे यांच्याविरोधात राजू पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता बारणेंना न्यायालयीन लढाईही जिंकावी लागणार आहे.
दरम्यान, राजू पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये मतमोजणी आणि प्रचारावेळी गैरप्रकार झाल्याचे म्हटले आहे. ‘झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणीत आलेले मतदानात यात जवळपास ५७३ मतांचा फरक अढळून आला. मतमोजणी सुरू असताना अनेक अनोळखी व्यक्ती मतमोजणी केंद्रावर फिरत होते. याबाबत रितसर तक्रार करुनही कोणतीच दखल घेतली गेली नाही, असेही राजू पाटील यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पूजा लांडगेंकडून ‘श्रावणसरी अन् मंगळागौरी’चे आयोजन; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
-Pune: सिंहगड रोडवरील उड्डाणपूलावरुन ठाकरे गट, शरद पवार गट अन् भाजपमध्ये मोठा वाद
-‘मुख्यमंत्री माझा लाडका खड्डा’, खड्डानाथ, खड्डादादा अन् खड्डेंद्र…; पुण्यात काँग्रेसची बॅनरबाजी