पुणे : पॅरिस ऑलिंम्पीक स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून देत भारताची मान जगात उंचावेल अशी कामगिरी करणारा स्वप्निल कुसळे आज मायदेशी परतला आहे. आज स्वप्निलचे पुण्यात विमानतळावर मोठ्या उत्साहात, जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर स्वप्निलने श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टकडून स्वप्निलला शुभेच्छा देत श्रींची मूर्ती भेट देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.
स्वप्निल कुसळे हा मूळचा कोल्हापूरचा असून पॅरिस ऑलिंम्पिंक २०२४ स्पर्धेमध्ये स्वप्निलने ५० मीटर रायफल थ्री-पोझिशनमध्ये कांस्यपदक पदक मिळवले आहे. असून वैयक्तिक पदक मिळविणारे महाराष्ट्रातील तो दुसरे खेळाडू ठरला आहे. स्वप्निल कुसळेने आपल्या आई-वडिल बहिणीसह गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना स्वप्निल म्हणाला की, ‘पहिले गणपती बाप्पा मोरया..बाप्पाच्या मुळेच सर्व काही आहे म्हणून पाहिले बाप्पाला भेटायला आलो आहे.जे मागितलं आहे ते बाप्पाने आजपर्यंत दिलं आहे.’ तसेच स्वप्निलला दगडूशेट हलावई गणपतीची आरती करण्याचा मानही देण्यात आला. आजची दगडूशेट गणतीची आरती स्वप्निलच्या हस्ते करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या-
-Pune: सिंहगड रोडवरील उड्डाणपूलावरुन ठाकरे गट, शरद पवार गट अन् भाजपमध्ये मोठा वाद
-‘मुख्यमंत्री माझा लाडका खड्डा’, खड्डानाथ, खड्डादादा अन् खड्डेंद्र…; पुण्यात काँग्रेसची बॅनरबाजी
-विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? अजित पवारांनी थेट सांगितला
-‘मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असती तर मी सगळा पक्षच…’; अजित पवार असं का म्हणाले?
-पुणेकरांचं टेन्शन वाढलं; एका दिवसात तब्बल ७ रुग्णांची नव्याने नोंद