पुणे : पुणे शहरामध्ये अनेक भागामध्ये रस्त्यांवर खड्डे दिसून येत आहेत. यामुळे भर पावसात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असतो. या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तसेच वाहतूक कोंडीचे देखील प्रमाण वाढत आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात आता काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.
पुणे शहरामध्ये खड्ड्यांविरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेसकडून राज्य सरकारविरोधात ठिकठिकाणी उपरोधिक टीका करत बॅनर लावण्यात आले आहेत. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाव साधर्म्य करुन सर्वोत्कृष्ट धोका खड्डानाथ, सर्वोत्कृष्ट बारा खड्डादादा आणि सर्वोत्कृष्ट मोठा खड्डेंद्र’ असे बक्षिस ठेवले असल्याचे बॅनर लागले आहे. राज जाधव आणि संकेत गलांडे यांच्याकडून हे बॅनर लावले आहेत.
आपल्या भागातील अत्यंत धोकादायक खड्डा पाठवा आणि जीव वाचवा असे आवाहन काँग्रेसने केले आहे. या स्पर्धेत सहभागी घेतलेल्या नागरिकांना जागरूक नागरिक पुरस्कार दिला जाणार असल्याचे बॅनरवरुन सांगण्यात आले आहे. तसेच अत्यंत ३ धोकादायक खड्डे पाठवून जीव वाचवल्याबद्दल १५०० रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे. या ३ खड्ड्यांना खड्डानाथ, खड्डादादा, खड्डेंद्र…अशी नावे काँग्रेसकडून दिली गेली आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? अजित पवारांनी थेट सांगितला
-‘मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असती तर मी सगळा पक्षच…’; अजित पवार असं का म्हणाले?
-पुणेकरांचं टेन्शन वाढलं; एका दिवसात तब्बल ७ रुग्णांची नव्याने नोंद
-पुण्यात पुन्हा पूरस्थिती; मुख्यमंत्र्यांच्या आदेश येताच शिवसेना धावली नागरिकांच्या मदतीला!
-पर्वतीत यंदा काँग्रेसचाच आमदार! आबा बागुलांना विश्वास; नाना पटोलेंच्या भेटीनंतर पोस्ट करत म्हणाले….