पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुफान फकटेबाजी केल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या चरित्रग्रंथाचे ठाण्यात प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना अजित पवार भर सभागृहामध्ये शिंदे, फडणवीसांसमोरच मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असती तर पक्षच घेऊन आलो असतो, असे म्हणाले. यामुळे आता राज्याच्या राजकारणात नवा ट्वीस्ट आला आहे.
तुम्ही ज्यावेळी एकनाथ शिंदेंना सांगितलं इतके आमदार घेऊन आलात तर तुम्हाला मुख्यमंत्री करणार. अरे मला सांगायचं ना मी तर सगळा पक्षच आणला असता. आज राज्याचे प्रमुख सांभाळत असताना देखील आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये दरे या मूळ गावी शिंदे सातत्याने जात असतात. तिथल्या शेती तिथल्या मातीमध्ये काम करताना त्यांचे व्हिडिओ त्यांचे फोटो मीडियामध्ये आम्ही बघत असतो. मला सुद्धा शेतीची आवड आहे. तुम्हाला खोटं नाही सांगत मी बारामतीला जातो, तेव्हा पहाटे ६ वाजता माझ्या शेतामध्ये चक्कर मारायला जातो. परंतु मीडियात आमचे एकनाथरांचे एवढे फॅन असल्यामुळे आमचा कुठला फोटोच येत नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.
‘शिंदेंच्या शिवसेनेतील निम्मी अर्धी लोक तर माझीच आहेत. एकनाथ शिंदे असे काही बसतात की, त्यांनी माझे कधी फोडून नेले, मलाच कळलं नाही. एवढ्यावरही शिंदे थांबले नाहीत, यानंतर मलाही त्यांच्यासोबत घेऊन गेले’, असंही अजित पवार यावेळी मिश्किलपणे म्हणाले आहेत.
माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची टर्म १९९९ ला सुरू झाली. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांची २००४ मध्ये सुरू झाले. या सगळ्यांमध्ये विधानसभेत सीनियर मी आहे. मी ९० च्या बॅचचा आहे. बाकी सगळे माझ्या नंतरचे आहेत. पण सगळे माझ्या पुढे निघून गेले मी मात्र मागेच राहिलो, असे म्हणत अजित पवारांनी खंत व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांचं टेन्शन वाढलं; एका दिवसात तब्बल ७ रुग्णांची नव्याने नोंद
-पुण्यात पुन्हा पूरस्थिती; मुख्यमंत्र्यांच्या आदेश येताच शिवसेना धावली नागरिकांच्या मदतीला!
-पर्वतीत यंदा काँग्रेसचाच आमदार! आबा बागुलांना विश्वास; नाना पटोलेंच्या भेटीनंतर पोस्ट करत म्हणाले….
-Pune: पुराच्या पाण्याखाली गेलेल्या वाहनांना मिळणार इन्शुरन्स; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
-सावधान! पुण्यात पुन्हा पूर; खडकवासला धरण ६५ टक्क्यापर्यंत खाली करण्याचे पालकमंत्र्यांच्या सूचना