पुणे : पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यात धरण साखळी क्षेत्र परिसरामध्ये सुरु असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील चारही धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे खडकवासला धरण क्षेत्रातून पाण्याचा आज सकाळपासून विसर्ग वाढवण्यात आला आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी खडकवासला धरणातून ६५ टक्क्यांपर्यंत विसर्ग सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
पुणे शहरात अवघ्या १० दिवसात दुसऱ्यांदा आलेल्या पुरामुळे सिंहगड रोड परिसरातील एकतानगर परिसरातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांंदा पूर आलेला असताना, जी तत्परता दाखवली, त्याच प्रकारची तत्परता याही वेळेस दाखवली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपली पक्षांतर्गत यंत्रणा कामास लावली आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांना व्यक्तिशः फोन करत पुरग्रस्तांना आवश्यक ती मदत देण्याचे निर्देश दिले. एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार शिवसेनेच्या पदाधिकऱ्यांनी तात्काळ विनाविलंब पूरग्रस्तांना मदत पोहचविली आहे.
प्रमोद नाना भानगिरे यांनी पूर आलेल्या सिंहगड रोडवरील एकता नगर, विठ्ठलनगर भागात पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्ती ग्रस्तांसाठी निवाऱ्याची आणि भोजनाची व्यवस्था केली आहे. यावेळी शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे, महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, उपायुक्त माधव जगताप, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, उपसंघटक श्रीकांत पुजारी, उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर, नितीन लगस, महेंद्र जोशी, कौस्तुभ कुलकर्णी, निलेश धुमाळ, प्रसाद बेल्हेकर, आणि पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-पर्वतीत यंदा काँग्रेसचाच आमदार! आबा बागुलांना विश्वास; नाना पटोलेंच्या भेटीनंतर पोस्ट करत म्हणाले….
-Pune: पुराच्या पाण्याखाली गेलेल्या वाहनांना मिळणार इन्शुरन्स; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
-सावधान! पुण्यात पुन्हा पूर; खडकवासला धरण ६५ टक्क्यापर्यंत खाली करण्याचे पालकमंत्र्यांच्या सूचना
-Pune: काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष बदलावरुन वाद; अरविंद शिंदे म्हणाले ‘मी त्यांच्याशी…’
-पुणेकरांनो सावधान! खडकवासल्यातून विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा