बारामती | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या सडेतोड वक्तव्ये आणि रांगड्या भाषेमुळे नेहमीच चर्चेत असतात. अजित पवार हे कार्यकर्त्यांना खडसावून बोलतानाही रांगड्या भाषेत बोलतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. अजित पवारांच्या धरणाबाबत केलेल्या वक्तव्यापासून अजित पवारांचे वक्तव्ये चांगलीच चर्चेत असतात.
अजित पवार नुकतेच बारामती दौऱ्यावर गेले होते. यावेळी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे. अजित पवारांनी सकाळी शहरातील विविध विकास कामांची पाहणी केली. त्यानंतर अजित पवारांच्या निवासस्थानी जनता दरबार घेतला. त्यानंतर अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत ‘एक कुटुंब एक झाड’ संकल्पना राबविण्यात आली. यावेळी अजित पवारांच्या हस्ते झाडांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये अजित पवार योजनांची माहिती देत होते. तेव्हा, कार्यकर्त्यांनी ‘एकच वादा अजितदादा’, अशा घोषणांनी कार्यक्रम दणाणून सोडला. यावर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मिश्किल टोला लगावला आहे. “लक्षात आलं आहे. बसा जरा… हा वादा लोकसभेला कुठे गेला होता, कुणाला माहिती?” अशी फिरकी घेत अजित पवारांनी घेतली. अजित पवारांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune: पुराच्या पाण्याखाली गेलेल्या वाहनांना मिळणार इन्शुरन्स; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
-सावधान! पुण्यात पुन्हा पूर; खडकवासला धरण ६५ टक्क्यापर्यंत खाली करण्याचे पालकमंत्र्यांच्या सूचना
-Pune: काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष बदलावरुन वाद; अरविंद शिंदे म्हणाले ‘मी त्यांच्याशी…’
-पुणेकरांनो सावधान! खडकवासल्यातून विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा