पुणे : एकीकडे राज्याभर अतिमुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये पूर परिस्थिती आहे. तर दुसरीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पुणे शहरतील ८ मतदारसंघापैकी एक असलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी माजी उपमहापौर उल्हास उर्फ आबा बागुल हे गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही आहेत. तसेच यंदा देखील आबा बागुल यांनी पर्वतीमधून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये पर्वती मतदारसंघ हा कायम राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली. त्यामुळे आबा बागुल यांच्या पदरी निराशाच पडली.
आता येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला पर्वतीतून उमेदवारी मिळायलाच हवी, असा चंग बांधत आबा बागुल हे कामाला लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. त्यांनंतर आता त्यांनी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही भेट घेतली. यावेळी ‘मी पर्वती विधानसभा मतदारसंघातून प्रबळ दावेदार असल्याचे स्पष्ट करताना निवडून येणारच’, अशी खात्री आबा बागुल यांनी नाना पटोलेंना दिली.
दरम्यान, नाना पटोले यांनी काँग्रेस पक्ष निश्चितच आपला विचार करणार आणि यंदा पर्वती मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे येईल, अशी ग्वाही दिली असल्याचे आबा बागुल यांनी सांगितले. यावरुन महाविकास आघाडीच्या जागावाटपासून पर्वतीची जागा काँग्रेसला मिळाल्यास आबा बागुल यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune: पुराच्या पाण्याखाली गेलेल्या वाहनांना मिळणार इन्शुरन्स; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
-सावधान! पुण्यात पुन्हा पूर; खडकवासला धरण ६५ टक्क्यापर्यंत खाली करण्याचे पालकमंत्र्यांच्या सूचना
-Pune: काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष बदलावरुन वाद; अरविंद शिंदे म्हणाले ‘मी त्यांच्याशी…’
-पुणेकरांनो सावधान! खडकवासल्यातून विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
-अन् पुण्यातल्या खड्यांवरून मोहोळ झाले आक्रमक, म्हणाले “कामात हयगय करणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना…”