पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज पुण्यात ‘शिवसंकल्प मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेता त्यांना ढेकणाची उपमा दिली आहे.
‘आता लढाई मैदानात होणार, हॉलमध्ये नाही. एकतर तू राहशील किंवा मी राहीन. काहींना वाटलं त्यांना हे आव्हान दिलं आहे. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे. मी म्हणजे माझा संस्कारिक महाराष्ट्र आहे. तू म्हणजे महाराष्ट्रातील दरेडेखोर टोळक्यांचा अख्खा पक्ष आहे. ढेकणाला मी कधी आव्हान देत नाही. ढेकणं बोटानं चिरडायची असतात. त्यामुळे कुणाला तरी वाटले, त्यालाच बोलतोय’, असे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्षपणे म्हणाले आहेत.
‘त्यांनी सांगितलं, माझ्या नादाला लागू नका. अरे तुझ्या नादाला लागण्याएवढा कुवतीचा तू नाहीच. तू राहूच शकत नाही. तुझा बंदबोस्त करण्यासाठी मैदानात उतरलो आहे’, असे म्हणत नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर आगपाखड केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मावळात महायुतीत संघर्ष अटळ: भाजपच्या बाळा भेगडेंची बंडखोरी, भर सभेत म्हणाले,…
-पुण्यात ठाकरेंचा मेळावा, या चार जागांवर दावा; महविकास आघाडीत खटके उडणार?
-विधानसभेच्या तोंडावर इंदापूरात अजित पवारांना धक्का; ‘या’ युवा नेत्याने हाती घेतली ‘तुतारी’