पुणे : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पुण्यात आज मेळावा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळाव्या यासाठी मविआतील तिन्हीही पक्षातील नेते आग्रही आहेत. पुण्यात ‘शिवसंकल्प मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यातील ३ जागा आम्हाला मिळायला हव्यात असे म्हणाल्या आहेत.
‘प्रेमापोटी विधानसभेला जास्तीच्या जागा मित्र पक्षांना सोडून नका’, असे आवाहन सुषमा अंधारे यांनी वरिष्ठांना करुन शहरातील ३ जागा आम्हालाच मिळाव्या अशी मागणीही केली आहे. ‘वडगाव शेरी, कोथरूड आणि हडपसर या जागा आम्हाला म्हणजे आम्हालाच मिळायला हव्या, असे म्हणत सुषमा अंधारेंनी यांनी मागणी केली आहे.
सुषमा अंधारे यांच्या मागणीनंतर राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देखील येत्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपामध्ये शिवसेना तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. सभागृहामध्ये जुन्नर आणि खडकवासला जागेचीही मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीतील मित्र पक्षांच्या नेत्यांनी जागावाटपाबाबत भाष्य करू नये, असे आवाहन केले असताना देखील सुषमा अंधारेंनी हा दावा केला आहे. हडपसर आणि वडगाव शेरी या दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार 2019 मध्ये निवडून आले आहेत. त्यामुळे या जागांवरती यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) दावा केला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये पुण्यातील जागावाटपावरुन वाद होण्याची दाट शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मावळात महायुतीत संघर्ष अटळ: भाजपच्या बाळा भेगडेंची बंडखोरी, भर सभेत म्हणाले,…
-पुण्यात ठाकरेंचा मेळावा, या चार जागांवर दावा; महविकास आघाडीत खटके उडणार?
-विधानसभेच्या तोंडावर इंदापूरात अजित पवारांना धक्का; ‘या’ युवा नेत्याने हाती घेतली ‘तुतारी’
-‘इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील लढवणारच’; लेकीचा निर्धार, दत्तात्रय भरणेंची डोकेदुखी वाढली