पुणे : मावळच्या जागेवरुन महायुतीत मोठी ठिणगी पडली आहे. महायुतीच्या ‘ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला ती जागा मिळणार’ या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी मावळ विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. मात्र, भाजपकडूनही मावळच्या जागेवर दावा केला जात आहे.
माजी राज्यमंत्री आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी मावळच्या जागेवर दावा केल्यामुळे महायुतीमध्ये या जागेवरुन वादाला सुरुवात झाली आहे. भाजपच्या बाळा भेगडे यांनी मावळमधून महायुतीने सुनील शेळके यांना उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. बाळा भेगडे यांनी भर सभेत प्रचार करणार नसल्याचे बोलून दाखवले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच महायुतीच्या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असताना देखील भाजपच्या बाळा भेगडेंनी या जागेवर लढण्याची संधी आपल्याला मिळावी म्हणून शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. भेगडे यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार आहेत. तसेच भाजपचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांनी वाढदिवसानिमित्त जोरदार बॅनरबाजी करत बाळा भेगडे हेच विधानसभेचे उमेदवार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे आता मावळच्या जागेवरुन महायुतीती संघर्ष नक्की असल्याचं दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात ठाकरेंचा मेळावा, या चार जागांवर दावा; महविकास आघाडीत खटके उडणार?
-विधानसभेच्या तोंडावर इंदापूरात अजित पवारांना धक्का; ‘या’ युवा नेत्याने हाती घेतली ‘तुतारी’
-‘इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील लढवणारच’; लेकीचा निर्धार, दत्तात्रय भरणेंची डोकेदुखी वाढली
-वेशांतर करुन अजित पवार दिल्लीला? दादा भडकले, ‘असं म्हणणाऱ्यांना लाज, लज्जा, शरम..’