पुणे : पुणे शहरामधील ८ विधानसभा मतदारसंघामध्ये ४ मतदारसंघामध्ये शिवसेना सत्ता गाजवत होती. मात्र आता कित्येक वर्षांपासून सेनेला सत्तेपासून लांब रहावं लागलं. शिवसेना आणि भाजप यांच्यात तुटलेल्या युतीचा फटका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बसला आहे. आता येणाऱ्या विधानसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. पुण्यात शनिवारी उद्धव ठाकरेंचा यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीकडून शिवेसेना विधानसभा निवडणूक लढणार आहे. मात्र, पुणे शहरामध्ये काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद आता कमी असल्यामुळे शहरातील शिवसैनिकांनी पुण्यातील ४ मतदारसंघांवर दावा केला आहे. यापैकी पुणे काँन्टनमेंट, कसबा पेठ, शिवाजीनगर आणि कोथरुड या मतदारसंघांवर शिवसैनिकांनी दावा केला आहे. या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. शनिवारी होणाऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संजीवनी देणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.
दरम्यान, राज्यातील इतर शहरांसह पुण्यातूनही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी पुण्यात मेळाव्याला येण्याचे मान्य केले असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे शहरातील शिवसेनेची ताकद आणखी कमी झाली असून, आधी भाजपसोबत आणि आता महाविकास आघाडीसोबत फरपट होत असल्याची खंत अनेक जुन्या शिवसैनिकांना आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसभेच्या तोंडावर इंदापूरात अजित पवारांना धक्का; ‘या’ युवा नेत्याने हाती घेतली ‘तुतारी’
-‘इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील लढवणारच’; लेकीचा निर्धार, दत्तात्रय भरणेंची डोकेदुखी वाढली
-वेशांतर करुन अजित पवार दिल्लीला? दादा भडकले, ‘असं म्हणणाऱ्यांना लाज, लज्जा, शरम..’
-पुणेकरांनो सावधान! झिका व्हायरसने घेतला चौथा बळी; ‘या’ भागात जास्त धोका?