पुणे : देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील अनेकांनी पक्षाला रामराम केला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडेलेल्या आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेल्या अजित गव्हाणे यांनी देखील आपल्या समर्थकन माजी नगरसेवकांसह शरद पवारांसोबत गेले.
अशातच आता अजित पवारांना इंदापूरमध्ये आणखी एक धक्का बसला आहे. इंदापूरमधील सोनाई परिवाराचे प्रवीण माने यांनी अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली आहे. प्रवीण माने यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापूर दौऱ्यावर आले असताना यांच्या स्वागतासाठीही प्रवीण मानेंनी हजेरी लावली होती.
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना मिळालेल्या अपयशामुळे निकालानंतर काही दिवसांतच प्रवीण माने यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. यानंतर आता प्रवीण माने उद्या पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. दरम्यान, एकीकडे इंदापूरच्या जागेवर भाजपने दावा केला आहे तर दुसरीकडे प्रवीण माने यांनी अजित पवारांची साथ सोडली त्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील लढवणारच’; लेकीचा निर्धार, दत्तात्रय भरणेंची डोकेदुखी वाढली
-वेशांतर करुन अजित पवार दिल्लीला? दादा भडकले, ‘असं म्हणणाऱ्यांना लाज, लज्जा, शरम..’
-पुणेकरांनो सावधान! झिका व्हायरसने घेतला चौथा बळी; ‘या’ भागात जास्त धोका?
-Kasba Vidhansabha: मैदानात कोण उतरणार? भाजपसह काँग्रेस, शिवसेना, मनसेत इच्छुकांची भाऊगर्दी