पुणे : राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करुन निवडणूक लढणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांनी राज्यात विविध ठिकणी दौरे केले असून निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे.
२९ ऑगस्ट रोजी निवडणूक लढण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटलांनी पिंपरीमध्ये पत्रकारांंशी बोलताना सांगितले आहे. त्यातच आज पुणे न्यायलायत हजर होण्याआधीच मनोज जरांग पाटलांनी पुण्यातील मतदारसंघांची चाचपणी सुरु केली आहे. येत्या ७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट या दरम्यान जरांगे पाटील राज्यातील विविध जिल्ह्यात सभ घेणार आहे.
येत्या ११ ऑगस्ट रोजी पुण्यात सभा घेणार असून या सभेला पुण्यातील बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जरांगे पाटलांनी केले आहे. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांनी पुण्यातील ८ही मतदारसंघावर आढावा घेतला. तसेच आपल्या समर्थकांसोबत बैठका घेऊन मनोज जरांगे पाटलांनी पुणे शहरातील ८ विधानसभा मतदारसंघांची चाचपणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवरुन चंद्रकांत पाटलांचा सणसणीत टोला; म्हणाले, ‘त्यांच्या भाषणात…’
-पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्य पदाचा तिढा काही सुटेना!
-अजित पवारांविरोधात शरद पवारांची खेळी; ‘या’ तरुणांना मिळणार तुतारीकडून संधी
-पुण्यात क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला जोर; हवामान खात्याकडून अलर्ट जारी
-Hadapsar: लोकसभेच्या विजयाने महाविकास आघाडीची गाडी जोरात, महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेच