पुणे : महाराष्ट्रात झालेल्या सत्ताबदलानंतर भाजप आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये अनेक टीका-टिपण्णी, आरोप-प्रत्यारोप केल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. आता थेट ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेतृत्वावर सडकून टीका केली आहे. ‘विधानसभा निवडणुकीत भाजपची उरली सुरली गुर्मीही उतरवू. सगळं सहन करून मी उभारा राहिलो. यापुढे राजकारणात एकतर ते तरी राहतील किंवा मी राहिल’, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या या टीकेवरुन भाजपकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘माझा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळपास ४० वर्षापासून परिचय आहे. पण अलीकडच्या काळातील उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक भाषणात आगपाखड दिसून येते.’
‘तेच तेच मुद्दे लोकांनी किती वेळा ऐकावे, तुम्हाला एकनाथ शिंदे यांनी दगा दिला की, तुम्ही त्यांच्यावर अन्याय करत होता. त्यामुळे त्यांनी स्वतःची वाट स्वतः शोधली. तुम्ही त्यांचा हिंदुत्व नावाचा आत्मा दाबला होता. सर्वसामन्य माणसाला माहिती झालं आहे की, ही आगपाखड का चालू आहे?, हा प्रश्न मला मित्र या नात्याने पडला आहे, असा सणसणीत टोलाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्य पदाचा तिढा काही सुटेना!
-अजित पवारांविरोधात शरद पवारांची खेळी; ‘या’ तरुणांना मिळणार तुतारीकडून संधी
-पुण्यात क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला जोर; हवामान खात्याकडून अलर्ट जारी
-Hadapsar: लोकसभेच्या विजयाने महाविकास आघाडीची गाडी जोरात, महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेच
-मावळच्या जागेवर बाळा भेगडेंचा दावा; अजित पवारांच्या आमदाराची नाराजी, म्हणाले, ‘महायुतीचे वरिष्ठ…’