पुणे : राज्यात विधानसभा रणधुमाळी सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनी आपल्या एका उमेदवाराची घोषणा तर केलीच. महायुतीचे जागावाटप होण्याआधीच अनेक जागांवर दावे करण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.
शरद पवार गटाकडून २० जागांवर तरुणांना विधानसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच शरद पवारांविरोध अजित पवारांनी देखील जय्यत तयारी सुरु केली आहे. महायुतीच्या ‘ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला ती जागा सोडायची’ या महायुतीच्या फॉर्म्युलानुसार पुणे जिल्ह्यातील बारामतीतून अजित पवार तर इंदापूरमधून दत्तात्रय भरणे यांच्या नावाची चर्चा आहे.
दरम्यान, अजित पवार आणि आमदार दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात शरद पवारांनी मोर्चेबांधणी केली असून या दोन्ही जागांवरुन शरद पवार हे तरुणांना उमेदवारी देत अजित पवारांना नवं आव्हान देत असल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला जोर; हवामान खात्याकडून अलर्ट जारी
-Hadapsar: लोकसभेच्या विजयाने महाविकास आघाडीची गाडी जोरात, महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेच
-मावळच्या जागेवर बाळा भेगडेंचा दावा; अजित पवारांच्या आमदाराची नाराजी, म्हणाले, ‘महायुतीचे वरिष्ठ…’
-महिलांच्या तक्रारी मागे राजकीय वास? आमदार शिरोळेंना शंका, म्हणाले ‘त्या’ लोकांचा हेतू…