पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात मोठा ट्वीस्ट पहायला मिळाला आहे. पूजा खेडकर यांच्यावर गेल्या काही दिवसांमध्ये अनेक गंभीर आरोप झाले. यूपीएससीची फसवणूक करुन पूजा खेडकर अधिकारी झाल्याचे सांगितले जात होते. यावरुन यांच्यावर अटकेची टांगती तलवार असताना पूजा खेडकर फरार आहेत. या दरम्यान पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर आरोप केला होता.
पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर बुधवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयामध्ये सुनावणी झाली. यावेळी पूजा खेडकर यांचे वकील ॲड. माधवन यांनी देखील सुहास दिवसे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ‘सुहास दिवसें यांनी पूजा खेडकर यांचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला’, असे ॲड. माधवन म्हणाले आहेत.
पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध पूजाने लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांना त्यांच्या खोलीत यायला सांगितले होते. मात्र, पूजाने त्याला नकार दिला’, असा ॲड. माधवन म्हणाले. तसेच ‘माझ्यावर गुन्हेगारी खटला दाखल केल्याने आणि मला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याने मी माझा बचाव करण्यास असमर्थ आहे. त्यासाठी मला अटकपूर्व जामिनाची गरज आहे. मला अटक करण्यास स्थगिती दिल्यास मला बचावाची संधी मिळेल’, असे पूजा खेडकरने वकिलांमार्फत न्यायालयात सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मावळच्या जागेवर बाळा भेगडेंचा दावा; अजित पवारांच्या आमदाराची नाराजी, म्हणाले, ‘महायुतीचे वरिष्ठ…’
-महिलांच्या तक्रारी मागे राजकीय वास? आमदार शिरोळेंना शंका, म्हणाले ‘त्या’ लोकांचा हेतू…