पुणे : पुणे शहरामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न चांगलाच वाढत आहे. सुसंस्कृत पुणे शहरामधून आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांची आकडेवारीच आता समोर आली आहे. एखाद्या गोष्टीत विक्रम करण्यात पुणेकर नेहमीच पुढे असतात. अशातच आता २ वाहन चालकांच्या कारवाईने अक्षरश: विक्रम मोडला आहे.
वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे २ दुचाकी चालकांवर त्यांच्या दुचाकीच्या किमतीपेक्षही जास्त वाहतूक दंड आकारण्यात आला आहे. यापैकी एका वाहनावर १५४ वेळा वाहतूक नियम मोडले. तर दुसऱ्या वाहनावर १३० वेळा वाहतूक नियम मोडल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी सर्वाधिक दंड झालेल्या काही वाहनांची माहिती घेतली असता त्यात २१ पुणेकरांनी तब्बल १०० वेळा वाहतुकीचे नियम मोडले आहेत.
पुण्यातील ९८८ वाहनांकडून ५० पेक्षा अधिक वेळा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. पुणे शहर पोलिसांनी नियम मोडणाऱ्या गाड्या जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार आतापर्यंत ४४ गाड्या जप्त केल्या आहेत. प्रत्येक वाहतूक पोलीस विभागाला संबधित गाड्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आता १०० व ५० पेक्षा जास्त वेळा नियम मोडणाऱ्या गाड्यामध्ये खासगी वाहतूक करणारे आणि दंड न भरणाऱ्या वाहन चालकांचे परवाने रद्द केले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महिलांच्या तक्रारी मागे राजकीय वास? आमदार शिरोळेंना शंका, म्हणाले ‘त्या’ लोकांचा हेतू…
-Big Boss Marathi: बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण; कसा कमावतो एका दिवसात ८० हजार रुपये?
-लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीत संमतीशिवाय फोटो वापरला; महिलेची पुण्यातील भाजप आमदाराविरोधात तक्रार