पुणे : सध्याचं धावतं जग सोशल मीडियाच्या आहारी गेलेलं अनेक घटनांमधून समोर येत असतं. रील्स, प्रसिद्धीच्या मागे धावत नको ते जीवावर बेतणारे स्टंट केले जातात. यामुळे अनेकांनी आपला जीवही गमावला आहे. गेल्या काही वर्षात ब्लू व्हेल नावाची गेम सुरु होती. ती आजही आहेच म्हणा…याच ब्लू व्हेल गेममध्ये ५० टास्क दिले जातात. त्यामधील शेवटचा टास्क तो आत्महत्या करण्याचा.. अनेक तरुणांनी याच्या आहारी जाऊन आत्महत्याही केली. अशीच एक घटना आता पिंपरी-चिंचवड परिसरातून समोर आली आहे.
पिंपरी चिंचवडमधील दहावी शिकणाऱ्या मुलाला मोबाईल गेमचं भयंकर व्यसन लागलं. याच गेमच्या आहारी हा मुलगा इतका गेला की, त्याने इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी मारण्याचा टास्कही पूर्ण केला. यातच या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मृत्यूच्या घटनेनंतर पोलिसांनी घराची तपासणी केली असता, एका कागदावर मुलाने गेममधील टास्क लिहल्याचे पाहायला मिळाले. या घटनेने पिंपरी चिंचवड शहर चांगलंच हादरुन गेले आहे.
नेमकं काय घडलं?
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळांना अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर केली होती. गेल्या ६ महिन्यांपासून या मुलाला गेमचे व्यसन लागले होते. गेममुळे तो स्वतःला बेडरूममध्ये तीन-तीन तास कोंडून घेत होता. खोलीत एकटाच बडबड करत असायचा. कधी अचानक तो किचनमधील चाकू मागायला लागला होता. वेगवेगळे टास्क त्याला येऊ लागले, जे तो फॉलो करत गेला. हा बदल पाहून आई-वडील ही चिंतेत होते. २५ जुलैला शाळांना सुट्टी होती, तो ही दिवस त्याने गेम खेळण्यातचं घालवला. मग रात्री अनेक विनवण्या केल्यानंतर तो जेवणासाठी बाहेर पडला. मात्र, जेवण केल्यावर पुन्हा तो खोलीतच जाऊन बसला.
आई दुसऱ्या मुलाला ताप आल्यानं त्या चिंतेत होती. रात्रीचा एक वाजला मुलाचा ताप काय उतरेना, त्यामुळं आई जागीचं होती. त्याचवेळी सोसायटीच्या व्हाट्सएपवर एक मुल जखमी अवस्थेत खाली पडल्याचा मेसेज आला. तो मेसेज मुलाच्या आईने वाचला अन् तिला थोडी कुणकुण लागली. मग ती खोलीच्या दिशेने गेली, खोली आतून बंद होती. दुसरी चावी घेऊन खोली उघडली पण मुलगा आत नव्हता, त्यानंतर धावाधाव करत ती जखमी अवस्थेत पडलेल्या मुलाजवळ पोहचली, बघते तर काय? तो तीचाचं मुलगा होता. २६ जुलै ही त्याची शेवटची रात्र ठरली.
काही वर्षांपूर्वी पोकेमॅन, पब्जी यांसारख्या गेममध्ये शालेय मुले मानसिक रुग्ण झाल्याचे दिसून आले होते. आजच्या सोशल मीडिया आणि स्मार्टफोनच्या जमान्यात लहान मुलं, शालेय मुलंही मोबाईलच्या अधीन झाली आहेत. अशा परिस्थितीमध्ये मुलांकडे पालकांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. या घटनेनंतरही पोलिसांनी पालकांना महत्वाचे आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवार शरद पवारांसोबत जाणार?; कार्यकर्ते म्हणाले, ‘दादांना पक्षात घेतले तर…’
“…म्हणून देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर दबाव टाकला होता”; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
-शरद पवारांची वक्तव्यं महाराष्ट्रात दंगल घडवणारी; बावनकुळेंचा गंभीर आरोप