पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केल्यापासून अजित पवारांवर वारंवार टीका करण्यात आली. महायुतीमध्ये सामील झालेल्या अजित पवारांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसला आहे. अजित पवारांना एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. अजित पवारांना असा धक्का याआधी कधीही बसला नाही. त्यातच आता धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
‘अजित पवार परत राष्ट्रवादीत आले तर त्यांना घेऊ नये. त्यांना पुन्हा पक्षात घेतले तर प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होईल’, असे म्हणत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार घरवापसी करताना दिसत आहेत. लोकसभेच्या निकालावरुन विधानसभेपूर्वी अनेक नेत्यांची शरद पवार गटात इनिंग सुरू आहे. त्यातच अजित पवारही पुन्हा शरद पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे.
‘चर्चा तर तसे सुरूच आहे. पण माझं मत आहे की, या राज्याला जेव्हा आग लागली. तेव्हा हा बिबट्या पळून गेला आणि आता जंगलाची आग मतरूपी पाऊस पडून मतदारांनी विजवली आहे. अशा परिस्थितीत हा बिबट्या पुन्हा शिकारीसाठी माघारी आला तर इथला राष्ट्रवादीचा सच्चा सैनिक बिथरेल. त्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्यांना पुन्हा पक्षात घेतले तर प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होईल’, असे उत्तम जानकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
“…म्हणून देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर दबाव टाकला होता”; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
-शरद पवारांची वक्तव्यं महाराष्ट्रात दंगल घडवणारी; बावनकुळेंचा गंभीर आरोप
-पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप; प्रवाशांचे हाल