पुणे : पुणे शहरामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे अनेकांचे संसार पाण्यात बुडाले. काहींना आपला जीव गमवावा लागला. याच पुण्यातील पूरग्रस्त भागामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली. पूरग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी प्रशासनाच्या गलथान कारभारावर सडकून टीका केली आहे.
राज ठाकरेंनी केली प्रश्नांची सरबत्ती
“शहर वेडेवाकडे वाढले असून, योग्य नगर नियोजन नसल्याने शहरामध्ये पूरपरिस्थिती ओढवत आहे. हा संपूर्णपणे संबंधित सरकारी खात्यांचा निष्काळजीपणा आहे. नुकसान झालेल्या नागरिकांची नुकसान भरपाई सरकारने दिली पाहिजे. गेली दोन तीन वर्ष केंद्र सरकार महानगर पालिकेच्या निवडणुका घेत नाहीत. इथे नगरसेवक नाही. नगरसेवक नसल्याने जबाबदारी घेणार कोण, प्रशासनाशी बोलायचे कुणी? खडकवासला धरणातून किती पाणी सोडण्याचे नियोजन आहे? लोकांना त्या पाण्याचा धोका आहे का? हे सांगण्याचे सरकारचे काम नाही काय? अशा पद्धतीने कामे होत असतील तर याला काय सरकार चालविणे म्हणतात काय?
२४-२५ जुलै २०२४ रोजी पुण्यात झालेल्या पावसाने सर्वत्र हाहाकार उडवला. मुळात शहरनियोजनाचा अभाव, त्यात पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही आणि खडकवासला धरणातून पाणी सोडताना त्याचा विसर्ग किती होणार याची नागरिकांना पुरेशी कल्पना नाही. यामुळे नागरिकांचं अफाट नुकसान झालं.… pic.twitter.com/vu6F4CNDUd
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 28, 2024
‘शहर नियोजन नावाचा प्रकारच नाहीये. पुणे कुठपर्यंत पसरत आहे, याचा अंदाज नाही. सरकार पालिका निवडणूकच घेत नाहीत. दिसली जमीन की विकायची एवढाच प्रकार सध्या सुरू आहे. परराज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन घरे मिळवतात, पण इथल्या लोकांचा घरांसाठीचा संघर्ष सुरू आहे. याला काय सरकार चालविणं म्हणतात?’असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी राज्य सरकारच्या कामांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
“…म्हणून देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर दबाव टाकला होता”; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
-शरद पवारांची वक्तव्यं महाराष्ट्रात दंगल घडवणारी; बावनकुळेंचा गंभीर आरोप
-पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप; प्रवाशांचे हाल
-‘दादा, परत शिवसेनेत या’; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची आढळराव पाटलांना कळकळीची विनंती, अन्…
-Pune: ‘मी आयएएस आहे, माझ्या नादी लागाल तर….’; पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा उच्छाद