पुणे : राज्यात आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप टीका-टिपण्णी केली जात आहे. त्यातच सध्या राज्याच्या राजकारणामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपावरुन राज्याच्या राजकाणात मोठा गदारोळ सुरु आहे. ‘उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्यासह मविआमधील अनेक नेत्यांवर खोटे आरोप करणारी प्रतिज्ञापत्रं सादर करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर दबाव टाकला होता’, असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपाचे आपल्याकडे पुरावे असल्याचे अनिल देशमुख सांगत आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुख यांचे आरोप फेटाळले आहेत. अनिल देशमुख यांनी आज या सर्व प्रकरणाबाबत बोलताना धक्कादायक वक्तव्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबतचे रेकॉर्डिंग्ज आहेत, असे सांगून अनिल देशमुख यांचे आरोप फेटाळले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबावाचा आरोप केला. त्यासाठी समीत कदम नावाच्या व्यक्तीला बंद पाकिटात निरोप पाठवल्याचंही अनिल देशमुख यांनी सांगितलं. यावर बोलताना सुमीत कदम “त्यांचं डोकं फिरलंय एवढंच मी म्हणेन. उलट देशमुखांनी त्यांना मदत करण्यासाठी आपल्याला भेटायला बोलावलं होतं, असा दावाही समीत कदम यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवारांची वक्तव्यं महाराष्ट्रात दंगल घडवणारी; बावनकुळेंचा गंभीर आरोप
-पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप; प्रवाशांचे हाल
-‘दादा, परत शिवसेनेत या’; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची आढळराव पाटलांना कळकळीची विनंती, अन्…
-Pune: ‘मी आयएएस आहे, माझ्या नादी लागाल तर….’; पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा उच्छाद
-Manu Bhaker: ‘मनू’ने जिंकलं भारतीयांचं मन; कांस्यपदक मिळवून देत बनली भारताची पहिली महिला नेमबाज