पुणे : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहेत. ‘ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याची भाषा करत असल्याचा’ आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्रात दंगल घडवण्याची भाषा केली जात आहे. शरद पवारांचा यामागचा हेतू अद्याप लक्षात येत नाही’, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. बावनकुळे हे सोमवारी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केला आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
“निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा शरद पवार करत आहेत, ते चांगलं नाही. जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्रातील जनता दंगलीपर्यंत जाईल अशी परिस्थिती कधी नव्हती आणि होणारही नाही. पण काही लोक समाजात तेढ निर्माण करणे, अशी काही आंदोलनं निर्माण करत आहेत, ज्यामधून तेढ निर्माण होईल. समाजाला विचलित करण्याचे काम काही लोक करत आहेत. राज्यात वेगवेगळी आंदोलनं तयार करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा. शरद पवार यांनी दंगली घडवण्याची भाषा का केली? त्यांच्या मनात काय आहे ते मला माहिती नाही.”
महत्वाच्या बातम्या-
-पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप; प्रवाशांचे हाल
-‘दादा, परत शिवसेनेत या’; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची आढळराव पाटलांना कळकळीची विनंती, अन्…
-Pune: ‘मी आयएएस आहे, माझ्या नादी लागाल तर….’; पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा उच्छाद
-Manu Bhaker: ‘मनू’ने जिंकलं भारतीयांचं मन; कांस्यपदक मिळवून देत बनली भारताची पहिली महिला नेमबाज
-पावसामुळे रद्द झालेल्या पोलीस शिपाई पदाच्या ४४८ जागांसाठी भरती; नवे वेळापत्रक जाहीर, वाचा…