पुणे : पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारपासून संप सुरू केला आहे. पहाटे ३ वाजेपासून पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. वेतन वाढीसह कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. पीएमपीएलच्या संचलनातील गाड्या कमी झाल्याने शहरातील हजारो नागरिकांची गैरसोय होत असल्याचे सामोर आले आहे. कर्मचाऱ्यांच्या या संपाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.
पीएमपी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती स्थापन करण्यात आली. सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम विनाविलंब मिळावी, ६ वर्षांपासून सेवेत असणाऱ्या बदली रोजंदारी सेवकांना सेवेत कायम करण्यात यावे आणि कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पदोन्नती द्यावी, अशा काही विशेष मागण्या समितीकडून करण्यात आल्या होत्या.
कर्मचाऱ्यांच्या या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सोमवारपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. सोमवारी मध्यरात्रीपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्याचा फटका शालेय विद्यार्थी, नोकरदारांना बसला. या संपामुळे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील किमान बारा लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची पीएमपी प्रमुख सार्वजनिक सेवा आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘दादा, परत शिवसेनेत या’; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची आढळराव पाटलांना कळकळीची विनंती, अन्…
-Pune: ‘मी आयएएस आहे, माझ्या नादी लागाल तर….’; पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा उच्छाद
-Manu Bhaker: ‘मनू’ने जिंकलं भारतीयांचं मन; कांस्यपदक मिळवून देत बनली भारताची पहिली महिला नेमबाज
-पावसामुळे रद्द झालेल्या पोलीस शिपाई पदाच्या ४४८ जागांसाठी भरती; नवे वेळापत्रक जाहीर, वाचा…
-Pune Rain: काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस; पुढील दोन दिवस शहराला ऑरेंज अलर्ट