पुणे : संपूर्ण राज्याला मुसळधार पावसाने झोडले आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच २ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे जिल्ह्यात पुन्हा पावसाचा चांगलाच सडाका पहायला मिळाला. आजही सकाळपासून पावसाने थैमान घातले आहे. पुण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातील घाट माथ्यावरील भागात अतिमुसळधार तर इतर भागांमध्ये मुसळधार ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता.
रविवारपासून सुरु असलेल्या पावसामुळे आज देखील पुणे शहरासह काही जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने शहरासाठी ऑरेंज अलर्ट आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस ऑरेंज आणि रविवारी आज यलो अलर्ट दिला आहे. गेल्या ३ दिवसांपासून शहरात पावसाची संततधार सुरू आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल २३९मिलिमीटर इतका पाऊस बरसला आहे. म्हणजे ९.४१ इंच इतका पाऊस कोसळला आहे. या १ जून पासून ३२१० मिलीमीटर इतका पाऊस बरसला आहे. रात्री पासून पावसाने विश्रांती घेतली होती मात्र आज दुपारी पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का? शरद पवार अन् अजित पवार गटाचे आमदार एकाच मंचावर
-पुणे: पूरग्रस्त नागरिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, अन् मदत करा; मुरलीधर मोहोळांच्या सूचना