पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यातच आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे आणि खासदार शरद पवार हे आज एकाच मंचावर आल्याचे पहायला मिळाले आहे. हडपसरमधील शरद पवारांच्या कार्यक्रमाला चेतन तुपे यांनी हजेरी लावल्याचे पहायला मिळाले आहे.
सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने ‘गोल्डन जुलै’ या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम हडपसर मतदार संघातील वानवडी येथे होत असून या कार्यक्रमासाठी शरद पवारांसह माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी देखील हजेरी लावली आहे. याच कार्यक्रमामध्ये हडपसरचे अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांची हजेरी लावल्याचे पाहून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
चेतन तुपे काय म्हणाले?
दरम्यान,‘गोल्डन जुलै’ हा कार्यक्रम राजकीय नव्हता. त्यामुळे प्रोटोकॉल म्हणून मी या कार्यक्रमात उपस्थित होतो. राजकीय कार्यक्रम नसल्याने मी उपस्थित राहिलो. यावेळी शरद पवारांसोबत कोणतीही चर्चा झाली नाही. सातारा जिल्हा मित्रमंडळाचा स्नेहमेळावा असल्याने मी आलो. याच कार्यक्रमाच्या अध्यक्षाने एमएलए निमंत्रण दिलं होतं. मी हडपसरचा आमदार आहे. या वनवडी परिसरात हा कार्यक्रम असल्याने मी हजर होतो, असे चेतन तुपे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे: पूरग्रस्त नागरिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, अन् मदत करा; मुरलीधर मोहोळांच्या सूचना
-राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार; शिंदे गटाकडून मनधरणीचे प्रयत्न