पुणे : पुणे शहरामध्ये रविवारपासून सुरु असणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे शहारात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांना आपले जीव गमवावे लागले. हजारो नागरिकांचे संसार पाण्यात बुडाले. लाखोंचे नुकसान झाले. खडकवासला धरणक्षेत्रातून अचानक मध्यरात्री पाण्याचा विसर्ग वाढवला नदीला मोठा पूर आला होता. नदीकाठच्या सोसायट्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
पुण्यातील पूर परिस्थितीत कर्तव्यात कसुरी केल्याप्रकरणी पुणे महापालिकेचे सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना निलंबित करण्यात आले आहे. कामाच्या जबाबदारीमध्ये कसूर, कर्तव्य पार पाडताना गुणवत्ता, औचित्य आणि उत्तरदायित्व ठेवले नसल्याचा ठपका ठेवत खलाटे यांचे निलंबन करण्यात आले आहे.
शहरात अति मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली तेव्हा सिंहगड रस्ता भागातील सोसायट्या आणि घरांंध्ये पाणी झाले होते. पालकमंत्री अजित पवार यांनी पूर परिस्थिती निर्माण झालेल्या भागाला भेट दिली होती. नागरिकांचे हाल होण्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करा असे आदेश अजित पवारांनी दिले होते. त्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कारवाईचे आदेश दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आता महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी पुणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना निलंबित केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे: पूरग्रस्त नागरिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, अन् मदत करा; मुरलीधर मोहोळांच्या सूचना
-राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार; शिंदे गटाकडून मनधरणीचे प्रयत्न