पुणे : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेत महायुतीला दिलेल्या पाठिंब्यानंतर आगामी विधानसभेला काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. मनसे राज्यात २२५ ते २५० जागांवर निवडणूक लढवेल, असे राज ठाकरे यांनी सांगितले होते.
यानंतर महायुतीकडून राज ठाकरेंच्या मनधरणीचे पहिला अप्रत्यक्ष प्रयत्न शिंदे गटाकडून झाला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री आणि शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी राज ठाकरे यांच्याशी विधानसभेलाही युती होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. ‘आमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांचे मतपरिवर्तन होईल’, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. केसरकर हे शुक्रवारी पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
‘विधानसभा निवडणुकीला अजून उशीर आहे. प्रत्येक पक्ष हा सर्व जागांची तयारी करत असतो. आमची महायुती असून मागच्या वेळी राज ठाकरे यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांचे शिंदे साहेब तसेच फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहे. विशेषतः ते आमच्या विचाराचे आहे. म्हणून जेव्हा त्यांच्याशी बोलणे होईल तेव्हा नक्कीच त्यांचा मतपरिवर्तन होईल’, असंही दीपक केसरकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘स्मार्ट सिटी’ म्हणवणाऱ्या पुण्याचा विकास पूरात; एकाच पावसात झाली दुर्दशा
-Pune Rain: पुणेकरांना काहीसा दिलासा; पाऊस थांबला पण वीज अद्यापही गुल
-पुण्यातील हजारो नागरिकांचा संसार पाण्यात; अजित पवारांनी दिलं ‘हे’ आश्वासन