पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी, बारावीच्या पुरवणी परिक्षा सुरु आहे. मात्र, मुंबईसह राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस तर अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटी देखील झाली आहे. या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर २६ जुलै रोजी नियोजित करण्यात आलेल्या परिक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे.
आता दहावीची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन या विषयाचीपरिक्षा ३१ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत होईल. तर बारावीची तीन विषयांची परिक्षा ९ ऑगस्ट रोजी होणार आहेत. या दृष्टीने मंडळाने परीरक्षकांना प्रश्नपत्रिका व्यवस्थित पेट्यांमध्ये सीलबंद अवस्थेत सुखरूप ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पावसामुळे एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना राज्य मंडळातर्फे देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात पुणे, कोकण, मुंबई भागात मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे गुरुवारी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना अचानक सुट्टी देण्यात आली. तसेच येत्या २ दिवसात पावसाचा अंदाज असल्याने पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच दहावी-बारावी पुरवणी परीक्षा देखील पुढे ढकलली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातील हजारो नागरिकांचा संसार पाण्यात; अजित पवारांनी दिलं ‘हे’ आश्वासन
-पुण्यात पूरस्थिती! मोहोळ अधिवेशन सोडत थेट पुण्यात पोहचणार; जागेवर जाऊन करणार पाहणी
-पुण्यात येताच अजित पवार अॅक्शन मोडमध्ये; अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना