पुणे : पुणे शहरामध्ये रविवारपासून मुसळधार पावसाने जोर लावला आहे. तसेच गेल्या २ दिवसांपासून शहरामध्ये तसेच जिल्ह्यातील इतर भागातही अति मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. पुण्याच्या परिस्थितीचा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतली. नुकसानग्रस्त भागात जात अजित पवारांनी पाहणी केली. अजित पवार पाहणी करताना नागरिकांनी झालेल्या नुकसानाचं गाऱ्हाणं गायलं.
सध्या मुलांची शाळा, महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठीची सगळी कागदपत्रे पाण्यात भिजली आहेत. ग्राऊंड फ्लोअरला आमची घरे आहेत. त्यामुळे घरातील अनेक किमती वस्तू भिजल्या असून त्यांचे नुकसान झाले आहे, असे गाऱ्हाणे एकतानगर परिसरामधील महिलांनी अजित पवारांपुढे गायले आहे. ‘जे झालंय ते आम्ही नाकारत नाही. नुकसान झालेल्यांचा पंचनामा केला जाईल. सरकारकडून योग्य ती मदत केली जाईल”, असे आश्वासन अजित पवारांनी पाहणीवेळी नागरिकांना केले आहे.
कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात आपत्ती निवारणार्थ पाऊल उचलणं, हे पालकमंत्री म्हणून माझं कर्तव्य आहे.
पहाटेपासून राज्यभरातील पुरजन्य परिस्थितीचा आढावा मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षातून घेतल्यानंतर पुण्यात येऊन पुणे महानगरपालिकेतील आपत्कालीन नियंत्रण… pic.twitter.com/94bgW7HZYV
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 25, 2024
पुण्यात दाखल होताच अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर पुण्यातील पूर परिस्थितीचा आढावा अजित पवारांनी पोलीस आयुक्तालयामध्ये जाऊनही घेतला. पुणे महापालिकेच्या आपत्ती विभागातही अजित पवार गेले होते. तिथे त्यांनी पुणे शहरातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पाण्यात अडकलेल्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलवण्याचे बचावकार्य सुरु आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन अजित पवारांनी केले आहे.
#WATCH | Maharashtra Deputy CM Ajit Pawar visits flood-affected areas in Ekta Nagar and Vitthal Nagar of Pune city to take stock of the situation. pic.twitter.com/RGFJotLwIZ
— ANI (@ANI) July 25, 2024
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात पूरस्थिती! मोहोळ अधिवेशन सोडत थेट पुण्यात पोहचणार; जागेवर जाऊन करणार पाहणी
-पुण्यात येताच अजित पवार अॅक्शन मोडमध्ये; अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
-पुण्यात पावासाचा हाहाकार! कामाशिवाय घराबाहेर पडू नका; पालकमंत्री अजित पवारांचे नागरिकांना आवाहन