पुणे : पुणे शहरामध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. सोमवारपासून सलग पावसाची संसतधार सुरु आहे. मात्र कालपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. पुणे शहराला तसेच अनेक तालुकांना बुधवारीच रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच खडकवासला धरणाचे सर्व दरवाजे खुले करण्यात आले होते. मात्र, पहाटे खडकवासला धरणाक्षेत्रातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. नदीकाठच्या घरांमध्ये पाणी साचले आहे. तसेच सिंहगड रोडवरील अनेक सोसायट्यांमध्ये पाणा साचले आहे. यावर पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आज पहाटेपासूनच मी माझ्या कार्यालयातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विशेषतः मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर आणि सांगली येथे सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुरजन्य परिस्थितीचा आढावा घेत आहे.
सर्व जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना… pic.twitter.com/IsRazSE5g2
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 25, 2024
“रेड अलर्ट कालच देण्यात आला होता. आज पुणे-पिंपरी-चिंचवडच्या शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत. वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर ही धरणं कमी भरली होती. त्यामुळे पुण्याला निम्मा काळच पाणी पुरेल अशी स्थिती होती. पण आपल्याकडचं खडकवासला धरणं पावणे तीन टीएमसीचंच आहे. खडकवासलाच्या वरच्या भागात ८ इंचापेक्षा जास्त पाऊस पडला. पुण्यात जवळपास पाच इंच पाऊस झाला”, असे अजित पवारांनी सांगितले आहे.
आज पहाटेपासूनच मी माझ्या कार्यालयातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विशेषतः मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर आणि सांगली येथे सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुरजन्य परिस्थितीचा आढावा घेत आहे.
सर्व जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना… pic.twitter.com/IsRazSE5g2
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 25, 2024
‘…म्हणून धरणाचे दरवाजे उघडावे लागले’
“खडकवासला धरण तर लगेच भरते. धरण पावणेतीन टीएमसी आणि वरून साडेतीन टीएमसी पाणी आल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडावे लागले. ४५ हजारांपेक्षा जास्तीचा विसर्ग धरणातून सोडला. आम्ही पहाटे पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. रात्री पाणी सोडलं असतं तर लोक झोपेत असतानाच त्यांच्या घरांमध्ये पाणी शिरलं असतं. त्याचा लोकांना त्रास झाला असता. आत्ता पाणी बंडगार्डनला पोहोचलं आहे. दौंडला पोहोचलेलं नाही. त्याला अजून काही तास लागतील. त्यानंतर ते पाणी उजनीमध्ये जाईल. दौंडला कमी क्युसेक्सनंच पाणी जातंय”, अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.
‘गरज पडताच नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनीही पावसाचा जोर कमी होईपर्यंत आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे’, असे आवाहन अजित पवारांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात पावासाचा हाहाकार! कामाशिवाय घराबाहेर पडू नका; पालकमंत्री अजित पवारांचे नागरिकांना आवाहन
-संघटनेतून काढलं पण शेतकऱ्यांच्या मनातून कसे काढणार? रविकांत तूपकरांचा राजू शेट्टींवर घणाघात
-लोकसभेच्या पराभवानंतर आढळराव पाटलांना राज्य सरकारचा मोठा दिलासा; सोपवली ‘ही’ महत्वाची जबाबदारी
-फडणवीसांच्या भेटीआधी अजित पवारांची दिल्लीवारी; अमित शहांसोबत रात्री १ वाजता खलबतं
-लाडकी बहिण योजनेत १७ विघ्न; राज्य सरकारकडून पुन्हा एकदा ‘हे’ महत्वाचे ६ बदल