मुंबई | पुणे : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ जाहीर केली. अनेक अटी, शर्तींसह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला आहे. लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणे राज्यातील महिलांना सोईस्कर व्हावे यासाठी राज्य सरकारकडून अनेकदा बदलही करण्यात आले. त्यानंतर आता आणखी ६ बदल केले आहेत.
लाडकी बहिण योजनेमध्ये नव्याने केले बदल
यो योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील खाते देखील आता ग्राह्य धरले जाणार आहेत.
ग्रामस्तरीय समितीमार्फत प्रत्येक शनिवारी योजनेचा लाभ मिळालेल्या महिलांची नावे वाचून दाखवली जाणार आहेत. त्यामध्ये काही बदल असले तर तो करावा लागणार आहे.
एखाद्या परराज्यात जन्मलेल्या महिलेने महाराष्ट्रामधील पुरुषासोबत विवाह केला तर त्या महिलेला तिच्या पतीच्या कागदपत्रांवरुन या योजनेचा लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेला लाभार्थ म्हणून ग्राह्य धरुन तिच्याकडून ऑफलाईन फॉर्म भरुन घ्यावा.
ओटीपीचा कालावधी १० मिनिटांचा करावा.
नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे, असा काही या योजनेंच्या अटींमध्ये बदल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात २४ तास पावसाची संततधार; राज्यातील ‘या’ जिल्हांना सतर्कतेचा इशारा
-युपीएससीकडून गुन्हा दाखल झाला पण पूजा खेडकर गेल्या कुठे?
-वादग्रस्त पूजा खेडकरांचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र खोटं? चौकशीतून धक्कादायक माहिती समोर