पुणे : सध्या संपूर्ण राज्यभर चर्चेत असणाऱ्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार असल्याचे दिसत आहे. पूजा खेडकर यांच्या कारनाम्यामुळे आधीच पूजा खेडकर प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यातच आयएएस अधिकारी बनण्यासाठी त्यांनी खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे. याबाबतही चौकशी सुरु आहे. त्यातच यूपीएससीने गुन्हा दाखल केला अन् पूजा खेडकर नॉट रिअचेबल आहेत.
पूजा खेडकर यांची मसूरीच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र, ही चौकशी होण्याआधीच पूजा खेडकर गायब झाल्या असल्याचे बोलले जात आहे. पूजा खेडकर मसूरीच्या प्रशिक्षण केंद्राने दिलेल्या मुदतीत देखील पोहचल्या नाहीत. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असतान त्यांचा फोनही बंद असल्याची माहिती समोर आली आहे.
मसूरीमध्ये चौकशीसाठी पूजा खेडकर गैरहजर राहिली होती. बनावट कागदपत्रे दिल्याने पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘पूजा खेडकर यांच्या वडिलांची तरुंगात चौकशी सुरु आहे. आईकडे २ कोटींचा बंगला, कोट्यावधींची संपत्ती आहे. नॉनक्रिमिनल सर्टिफिकेट कसं मिळणार? दुसरी कोणतीही पळवाट नसल्याचे लक्षात आल्याने पूजा खेडकर गायब झाल्या’, असा दावा माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वादग्रस्त पूजा खेडकरांचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र खोटं? चौकशीतून धक्कादायक माहिती समोर
-घालीन लोटांगण, वंदीन बिहार, म्हणत अर्थसंकल्पावरुन अमोल कोल्हेंचा भाजपला खोचक टोला
-अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात काय झाले स्वस्त?