पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकरी, महिला, तरुण, उद्योजकांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पावरुन विरोधकांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत निशाणा साधला आहे.
अमोल कोल्हे यांच्या टीकेला भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. सर्वसामान्याला दिलासा देणारा आणि महागाई आटोक्यात ठेवणारा अर्थासंकल्प, म्हणत चित्रा वाघ यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आणि अमोल कोल्हेंच्या भाषेत त्यांच्या टीकेला प्रत्युत्तरही दिले आहे.
घालीन लोटांगण, बोलीन खोटे
फक्त सिल्वर ओकचे घालीन खेटे
घालीन खोलात राष्ट्र, करीत बदनाम महाराष्ट्र
मी नटरंग, माझे नवरंग खोट्यांचेच संग
नाटक करूया, फक्त बोलूया खमंग … @kolhe_amol @NCPspeaks https://t.co/k2OZfg0Ef7— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 23, 2024
‘आजच्या अर्थसंकल्पाचा सारांश : घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो!!’ असे अमोल कोल्हे म्हणाले तर त्यावर चित्रा वाघ अमोल कोल्हे यांची पोस्ट रिपोस्ट करत म्हणाल्या की, घालीन लोटांगण, बोलीन खोटे, फक्त सिल्वर ओकचे घालीन खेटे, घालीन खोलात राष्ट्र, करीत बदनाम महाराष्ट्र, मी नटरंग, माझे नवरंग, खोट्यांचेच संग, नाटक करूया, फक्त बोलूया खमंग, असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-घालीन लोटांगण, वंदीन बिहार, म्हणत अर्थसंकल्पावरुन अमोल कोल्हेंचा भाजपला खोचक टोला
-अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात काय झाले स्वस्त?
-ससून रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर; डॉक्टरांनीच रुग्णांना…
-पुणेकरांनो, गुरवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद राहणार
-हिम्मत असेल तर शरद पवारांनी….; अमित शहांनंतर आता पुणे भाजपचं शरद पवारांना ओपन चॅलेंज