पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकरी, महिला, तरुण, उद्योजकांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. तसेच दीर्घकालीन सुविधा देणाऱ्या योजनांचा पाऊस पाडला आहे. या सगळ्यातून एकीकडे भाजपकडून या अर्थसंकल्पावर स्तुतीसुमने उधळली जात असून दुसरीकडे विरोधकांनी मात्र यावर सडकून टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत निशाणा साधला आहे. अमोल कोल्हे यांनी आजच्या अर्थसंकल्पाचा सारांंश सांगत अर्थसंकल्पावरुन भाजपला खोचक टोला लगावला आहे.
आजच्या अर्थसंकल्पाचा सारांश :
घालीन लोटांगण वंदीन बिहार,
डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे,
दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र,
सरकार वाचवेन म्हणे नमो !!#UnionBudget2024 #BudgetSession #BudgetSession2024 #UnionBudget24 #Maharashtra #BiharSpecialStatus #AndhraPradesh…— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 23, 2024
‘आजच्या अर्थसंकल्पाचा सारांश : घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो!!’ असे म्हणत अमोल कोल्हे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर खोचक टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात काय झाले स्वस्त?
-ससून रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर; डॉक्टरांनीच रुग्णांना…
-पुणेकरांनो, गुरवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद राहणार
-हिम्मत असेल तर शरद पवारांनी….; अमित शहांनंतर आता पुणे भाजपचं शरद पवारांना ओपन चॅलेंज
-‘तो’ कॉल मोरेंच्याच जवळील व्यक्तीने केला नाही ना? वसंत मोरे धमकी प्रकरणाला नवीन वळण