पुणे : पुणे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद असणार आहे. पाईपलाईनमधून होणारी गळती थांबवण्याचे काम गुरुवारी करण्यात येणार आहे. स्वारगेट आणि परिसरातील भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे स्वारगेट परिरसातील नागरिकांना बुधवारी पाणी साठवून ठेवावे लागणार आहे.
पुण्यातील स्वारगेट मेट्रो स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पाणी गळती थांबविण्यासाठी जलवाहिनी दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील काही पेठांसह पूर्व भागामध्ये गुरुवारी (ता.२५) पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती आहे.
या भागात पाणी पुरवठा राहणार बंद
शंकरशेठ रस्ता परिसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, कासेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, मित्रमंडळ कॉलनीचा काही भाग, सारसबाग परिसर, घोरपडे पेठ, लक्ष्मीनारायण टॉकिज मागील परिसर, पर्वती दर्शनचा काही भाग,मीरा आनंद परिसर, श्रेयस सोसायटी, खडकमाळ आळी, शिवाजी रोड परिसर, मुकुंदनगर, महर्षीनगरचा काही भाग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कॉलनी, मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, अप्सरा टॉकिज परिसर.
महत्वाच्या बातम्या-
-हिम्मत असेल तर शरद पवारांनी….; अमित शहांनंतर आता पुणे भाजपचं शरद पवारांना ओपन चॅलेंज
-‘तो’ कॉल मोरेंच्याच जवळील व्यक्तीने केला नाही ना? वसंत मोरे धमकी प्रकरणाला नवीन वळण
-पर्वतीत महाआरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद; तपासणी करून घेण्यासाठी भर पावसातही नागरिकांची गर्दी