पुणे : नुकतेच शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेले पुण्याचे फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांनी मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला होता. यावर आता साईनाथ बाबर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘वसंत मोरेंना आलेल्या धमिकचा फोन मधील व्यक्ती ही मोरेंच्याच संबंधित असण्याची शक्यता, या घटनेचा सखोल चौकशी करा’, अशी मागणी साईनाथ बाबर यांनी केली आहे.
वसंत मोरे यांनी धमकी दिल्याची तक्रार पोलीसाना केली आहे.सदर तक्रारीची कसून चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करा. मनसे पुणे शहरचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष सुधीर धावडे यांनी फेसबुकवर हवामान खात्याने दिलेल्या दिलेल्या अंदाजबाबत केलेल्या एक पोस्टवर आलेल्या कमेंटवरून वसंत मोरे आणि त्याचे साथीदार याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी पोलीस कारवाई करत आहेत. सदर बाबत मी पुणे शहर अध्यक्ष या नात्याने पत्रकार परिषद घेतली होती. पोलिसांकडे कारवाईची मागणी देखील केली होती. यामुळे चिडून जाऊन वसंत मोरे हे काही महिन्यापूर्वी घडलेल्या किंवा आलेल्या एका फोन कॉल वरून पोलिसांकडे तक्रार करून हेतुपुरस्कर आरोप करत आहेत, असे साईनाथ बाबर म्हणाले आहेत.
‘पोलीस प्रशासनाला जुन्या घटनांमध्ये ओढून गलिच्छ राजकारण करणाऱ्यांना योग्य धडा शिकवण्यासाठी सबंधित गुन्ह्याचा सखोल तपास करावा. यातील आरोपी जर मोरे यांच्या संबंधित असेल तर वरील तक्रारदारांच्या विरोधात कडक कारवाई करावी’, अशी मागणी साईनाथ बाबर यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पर्वतीत महाआरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद; तपासणी करून घेण्यासाठी भर पावसातही नागरिकांची गर्दी