पुणे : पुण्यातील बालेवाडीत झालेल्या भाजपच्या कार्यकारिणी अधिवशेनामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. शरद पवारांना सर्वात जास्त भ्रष्टाचार करणारे आणि भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरक्या म्हणाले. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या आमदारांनी टीकेची झोड उठवली आहे. अजित पवारांचे कट्टर समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवरुन नाराजी व्यक्त केली आहे.
शरद पवार हे देशाचे नेते असून ते आमचे दैवत आहेत. भाजपने केलेली टीका योग्य नाही. ते भाजपनेही कबुल केलेलं आहे. भाजपने शरद पवारांचा आदरच केला पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शरद पवार हे माझे गुरू आहेत, असं म्हटलं होतं. यावरून भाजप नेते अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, ते योग्य नाही’, अशा शब्दात अण्णा बनसोडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते हे पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
‘शरद पवार राजकारणातील सर्वात मोठे भ्रष्टाचारी आहेत. शरद पवार हेच भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरके आहेत. राज्यातील भ्रष्टाचाराला पवारांनी संस्थात्मक स्वरूप दिले आहे’, अशी जहरी टीका बालेवाडी येथे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केली होती. यावर सकाळी अजित पवारांनी बोलणं टाळलं आणि आता त्यांच्याच आमदाराने अण्णा बनसोडे यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवार म्हणजे ‘भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरके…’ अमित शहांची सडकून टीका