पुणे : पुणे शहरामध्ये पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांनी मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हापासून सुनील टिंगरे यांच्याकडे संशयाने पाहिलं जात आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता मोठा गोप्यस्फोट केला आहे.
“आपल्या काही लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. या बदनामीमुळे शेवटी सुनीलची तीन ते चार चौकशी झाली. त्या चौकशीत जे काही घडले ते सुनीलने स्पष्ट सांगितले. यामध्ये सुनीलचा दुरान्वये देखील संबंध नव्हता. पण कारण नसताना काही जणांनी त्याचे नाव यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला”, असे म्हणत अजित पवारांनी सुनील टिंगरेंची बाजू उचलून धरल्याचे पहायला मिळाले आहे.
‘एखाद्या आमदाराच्या मतदारसंघात काही प्रकार घडला असेल तर तिथल्या आमदाराला रात्री जाणे भाग आहे. आधार देणे हे त्याचे कर्तव्य आहे. घटनास्थळी काय घडले आमदाराला पोलिस स्थानकात गेल्यावरच कळणार अगोदर त्याला काय स्वप्न पडणार का? महिला, पुरुष, युवक, युवतींनी व्यवस्थित राहा, कुठेही पक्षाची बदनामी होणार नाही, अशा प्रकारचे कृत्य तुमच्या हातून होऊ देऊ नका. मधल्या काही घटना पुण्याला बदनाम करणाऱ्या झाल्या. त्या प्रकरणात कडक अॅक्शन घेण्यास आपण मागे पु़ढे पाहिले नाही. जे जे त्या प्रकरणात होते त्यांच्या चौकशा करून त्यांच्यावर कारवाई केली. परंतु अशा काही घटना घडल्या तर यामध्ये काही चांगले देखील भरडले जातात, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवार म्हणजे ‘भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरके…’ अमित शहांची सडकून टीका
-10 कोटींचा ठेका अन् कसब्यात राडा; भाजप कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर रोखले