पुणे : राज्यात अनेक भागात गेल्या २ दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यातच पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन-तीन दिवसांपासून जोरदार पावसाची बरसात सुरू असून हवामान विभागाने अनेक भागात सर्तकतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्यासाठी आज आणि उद्या असे दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच त्यानंतरच्या २ दिवसांसाठी सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात आजपासून पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे जिल्ह्यातील ८४ बंधारे पाण्याखाली गेली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी देखील आज आणि उद्या असे २ दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. २४ आणि २५ जुलै रोजी सुद्धा येलो अलर्ट देण्यात आला असून २६ जुलै रोजी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवसांसाठी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ५ दिवस ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. साताऱ्यात शनिवारी सकाळपर्यंत २४ तासांत जिल्ह्यातील नवजा येथे १०० मिलीमीटर पाऊस पडला. जूनपासून आतापर्यंत नवजाला २ हजार ७२० मिलमीटर पर्जन्यमान झाले आहे. कोयना येथे आतापर्यंत २ हजार २८६ मिलीमीटर पाऊस झाला. महाबळेश्वरलाही २४ तासांत ९५ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवार म्हणजे ‘भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरके…’ अमित शहांची सडकून टीका
-10 कोटींचा ठेका अन् कसब्यात राडा; भाजप कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर रोखले