पुणे : सरकार आपल्या योजनांची जाहिरात करत जाहीर केलेल्या योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असता. अशीच एक जाहिरात महाराष्ट्र राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. सध्या या जाहिरातीची चांगलीच चर्चा सुरु आहे. कारणही तसंच आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या जेष्ठांना धार्मिक स्थळांचे दर्शनासाठी योजनेची जाहिरात केली होती. त्यावर लावण्यात आलेल्या एका आजोबांचा फोटो पाहून त्या आजोबांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.
“आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन” ही नवी योजना सुरु केली आहे. या योजनेची जाहिरातबाजी देखील सरकारकडून मोठ्या प्रमाणात सुरु आहे. याच योजनेच्या जाहिरात फलकावर लावण्यात आलेल्या फलकावर ज्या व्यक्तीचा फोटो आहे ती व्यक्ती गेले ३ वर्षांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शिरूर तालुक्यातील वरूडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे मागील ३ वर्षापासून बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबाने त्यांचा शोध घेतला परंतु ज्ञानेश्वर तांबे यांचा शोध लागला नाही. अखेरीस ३ वर्षानंतर मुख्यमंत्र्यांच्या “आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन” या जाहिरात फलकावर ज्ञानेश्वर तांबे यांचा फोटो दिसला. त्यावर ‘जेष्ठांना धार्मिक स्थळाचं दर्शन जाऊद्या, पण आम्हाला आमच्या वडिलांचे दर्शन घडवाट, अशी मागणी तांबे कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यान, कोणतंही सरकार असलं तरी अशा योजना जाहीर केल्यानंतर हजारो कोटींचा निधी खर्च केला जातो. मात्र सरकारच्या अनेक जाहिराती वादात अडकतात. त्यातीलच ही शिंदे सरकारची आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन ही योजना देखील त्याचाच एक भाग आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आधी म्हणाले, ‘मित्राचा मुलगा’ आता शरद पवार त्यांनाच म्हणाले ‘फडतूस माणूस’
-आरटीईच्या प्रवेशाची प्रतिक्षा संपली, वेटींग लिस्ट लागली; वाचा कधीपासून प्रवेश सुरु?
-वसंत मोरेंना ‘तो’ फोन कोणी केला? मोरेंच्या आरोपावरुन पुण्याच्या राजकारणात खळबळ
-‘गुलाबी मंच अन् गुलाबी कोट’, अजित पवारांच्या ‘त्या’ गुलाबी कोटचं रहस्य काय?
-होमग्राऊंडवर अजित पवारांना आणखी एक धक्का; आमदार घेणार हाती तुतारी, पवारांची भेटही झाली