पुणे : आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांसाठी मोठी बातमी आहे. शालेय शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. आता आरटीईच्या प्रवेशाची प्रतिक्षा संपली आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेशाची ठप्प असलेली प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा सुरू झाली आहे.
यंदा शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशांच्या नियमांत बदल केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. परिणामी न्यायालयात याचिका दाखल होऊन प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली. त्यामुळे जुलै महिना अर्धा होऊनही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नसल्यामुळे पालक आणि विद्यार्थी आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशात केलेले बदल घटनाबाह्य असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रवेशासाठीची विद्यार्थ्यांची निवडयादी, प्रतीक्षा यादी (वेटींग लिस्ट) जाहीर करण्यात आली आहे. पालकांना प्रवेशासाठीचे लघुसंदेश (एसएमएस) सोमवारपासून पाठवले जाणार आहेत. लघुसंदेश मिळालेल्या पालकांना २३ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्र पडताळणी करून पाल्याचा प्रवेश निश्चित करता येईल.
समाजीतील वंचित घटक समाजिक आणि अर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर खासगी शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे. आरटीई प्रवेशासाठी 2 लाख 42 हजार 516 विद्यार्थ्यांनी आरटीई प्रवेशासाठी अर्ज केला. मात्र प्रवेशासाठी 1 लाख 5 हजार 223 जागा उपलब्ध आहेत. त्यातील 93 हजार 9 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली असून 71 हजार 276 विद्यार्थ्यांचा समावेश प्रतीक्षा यादीत करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वसंत मोरेंना ‘तो’ फोन कोणी केला? मोरेंच्या आरोपावरुन पुण्याच्या राजकारणात खळबळ
-‘गुलाबी मंच अन् गुलाबी कोट’, अजित पवारांच्या ‘त्या’ गुलाबी कोटचं रहस्य काय?
-होमग्राऊंडवर अजित पवारांना आणखी एक धक्का; आमदार घेणार हाती तुतारी, पवारांची भेटही झाली
-अजित पवारांच्या आमदाराचे भाकीत, “तर दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात…”
-अजित पवारांच्या गुलाबी कोटवरुन अमोल कोल्हेंचा खोचक टोला म्हणाले, ‘त्यामागचा हेतू राज्याचं…’